चंद्रपूर जिल्ह्यात मूल तालुका प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता तालुका कृषी ऑफिस मूल येथून दि. २१जुलै २०२२ रोजी चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी श्री तिजारे सर, श्री कारडे सर (सांख्यिकी),, पिक विमा तालुका प्रतिनिधी श्री . श्रीरामे , कृषि पर्यवेक्षक, कृषी सहा्यक तसेच शेतकरी मूल हे उपस्थित होते.खरीप हंगाम 2022 ‘कप अँण्ड कॅप(80 : 110) बीड मॉडेलनुसारअधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठीविमा क्षेत्र घटक ग्राह्य धरून मान्यतादेण्यात आली. योजनेत सहभागघेण्यासाठी शेतकऱ्यांनी 13 जुलैपर्यंतअर्ज करावा. विम्याचा भार कमीकरण्यासाठी खरिपासाठी विमासंरक्षित रकमेच्या 2 टक्के निश्चितकरण्यात आला आहे. MUL तालुक्यात भात आणि सोयाबीन (प्रीमियम -भात. -955/-,’सोयाबीन-1055 /- ) पिकांसाठीविमा संरक्षणअनुक्रमे 47750 रु. व55750 रु. प्राप्त झाले आहे.त्यासाठी मुंबईच्या एचडीएफसी इर्गोइन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात
आली आहे. कर्जदार व बिगरकर्जदार शेतकर्यांना अधिसूचितक्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठीआहे. पीक पेरणीपासूनकाढणीपर्यंतच्या कालावधीतनैसर्गिक आग, बीज कोसळणे,गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ,भूस्खलन, पावसातील खंड, कीड-रोग आदींमुळे पिकांच्या उत्पादनातयेणारी घट जोखमीच्या बाबींमध्येसमाविष्ट आहे.हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी अथवालावणी न झाल्यामुळे होणारेनुकसान, पिकांचे काढणी पश्चातहोणारे नुकसान, तसेच स्थानिकनैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्यानुकसानीसाठी देखीळ या पीकविम्याचे संरक्षण मिळणार आहे.पिकाच्या नुकसानी संदर्भात 72तासांच्या आत नुकसान तक्रार विमाकंपनीला कळविणे बंधनकारकआहे. शेतकऱ्यांनी पीकविमाभरण्यासाठी जवळच्या आपलेसरकार सेवा केंद्राशी अथवा बँकेशीसंपर्क साधावा. तसेच अधिकमाहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषीपर्यवेक्षक, मंडळ कृषिअधिकारी,तालुका कृषी अधिकारीकार्यालय,बिमा प्रतिनिधी वजवळच्या ऑनलाइन केंद्राशी संपर्क
करावा.