नाली अभावी रस्त्यावर चिखल, गुरुदेव भक्तांना त्रास

22

मूल
येथील तहसिल कार्यालयाच्या मागील असलेल्या गुरुदेव सेवा मंडळ मूल येथे दररोज प्रार्थना करण्यासाठी मोठया प्रमाणावर भक्तगण येत असतात. जवळच कॉन्व्हेन्ट चे विद्यार्थी देखिल ज्ञानार्जन करीत असतात. माञ समोरील व मागील बाजूस सांडपाण्याची व्यवस्था न झाल्याने चिखल व दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात रस्ता व नाली बांधकाम करण्यासाठी नगर विकास मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्रमांक पुरक-२०१८ /प्र. क्र.९९/(६०)/नवि १६ दिनांक ५ मार्च २०१९ नुसार
२० कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता. त्यात या रस्ता व नालीचा समावेश करण्यात आला होता माञ नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष करुन दुसऱ्याच रस्त्याला प्राधान्य दिले त्यामुळे ही दुरावस्था निर्माण झाली आहे. सदर रस्ता व नाली करून देण्याची मागणी गुरुदेव सेवा मंडळ मूलचे अध्यक्ष चेतन कवाडकर यांनी एका निवेदनाद्वारे नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी विनोद येनुरकर यांचेकडे केली आहे. यावेळी नगर परिषद मूल चे माजी उपाध्यक्ष नंदु रणदिवे यांनी माजी मंत्री तथा आमदार सुधिर मुनगंटीवार यांच्या विशेष निधीतून काम करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी गुरुदेव सेवा मंडळ मूल व जनकल्याण शिक्षण संस्था मूलचे पदाधिकारी उपस्थित होते.