मूल शहरातील पाहणी करताना मूल चे प्रशासक, उपविभागीय अधिकारी , सामाजिक कार्यकर्ते,नप कर्मचारी, महसूल कर्मचारी

22
मुल शहरात काल पहाटेपासून मुसळधार पावसाची सुरवात झाली, भूतो न भविष्यती फक्त 3 ते 4 तासात 137 मिमि  इतका पाऊस पडला, या झालेल्या मुसळधार पावसामुळे मूल शहरातील अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना होणारी गैरसोय तात्काळ दूर करण्याच्या उद्देश ठेऊन येथील प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते, नप कर्मचारी, महसूल कर्मचारी यांना सोबत घेत साचलेले पाणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी मुसळधार पावसामध्येही कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला याबद्दल नगरपालिका कर्मचारीवर्गाचे मनःपूर्वक आभार,
यावेळी नगरपालिका मूल चे प्रशासक, उपविभागीय अधिकारी श्री महादेव खेडेकर साहेब हे स्वतः जातीने हजर राहत संपूर्ण शहरात फिरत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते, मूल नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष नंदुभाऊ रणदिवे, युवा सामाजिक कार्यकर्ते राकेश ठाकरे तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

६६ जणांना  सुरक्षितस्थळी हलविले  मूल शहरातील काही वॉर्डात  शनिवारी पाणी शिरल्याने वॉर्ड क्रमांक १४ मधील कोरकू वसाहतीतील १२कुटुंबातील ६६ लोकांना सुरक्षितस्थळी  हलविण्यात आले आहे. नगरपालिका  शाळेच्या नवीन इमारतीत त्यांची निवासाची  व्यवस्था करण्यात आली आहे.