मुल शहर जलमय जनजीवन विस्कळित

38

मुल संपूर्ण राज्यभरात मुल शहर एक सुंदर शहर,स्मार्ट सिटी म्हणून ओळख करण्यात असलेल्या मुल नगराचे काय हाल झाले आहे. हे सगळ कशामुळे होत आहे याचे चिंतन मुल नगरातील नागरिकांनी करण्याची गरज आहे. काल रात्रो पासून आलेल्या सतत मुसळधार पाउसामुळे.

 

कर्मवीर महाविद्यालय पासून वाहत आलेल्या पाऊसामुळे वॉर्ड नंबर १५ मधील चिंतावार लेआऊट संपूर्ण जलमय झालेला आहे. उपजिल्हा रुग्णालय कड्डील भागातील बुटेच्या घराकडे, शेलेकरच्या घराकडे, पानसे पासून पुढे तर संतोष सहारेचा रस्ता, सोनवणे घरापुढील रस्ते पाण्याने व्यापून गेल्याने अनेक घरात पाणी घुसल्याने बेडरूम,किचन, स्टोररुम मधील साहित्याची नासाडी झाली आहे.

वानखेडे यांच्या घरापासून सोनवणे यांच्या घरापर्यंतचा मुख्य हायवे रस्ता काही काळ पाण्याने बंद झाला असे विदारक चित्र मुल सारख्या स्मार्ट सिटीत निर्माण झाले. याला जबाबदार कोण असा प्रश्न मूलच्या नागरिकांनी उपस्थित केला आहे . तसेच दुर्गा मंदिराच्या मागून गेलेल्या डी.पी. रोड पूर्ण जलमय झाला. रोडच्या दोन्ही बाजूच्या घरात पाणीच पानी घुसले. दुर्गा मंदिर आवारात सुद्धा पाणी घुसल्याने पुराचा पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हीच अवस्था वॉर्ड नंबर १४ मधे झाली असून पंचायत समिती क्वार्टर पासून नगर परिषद तत्कालीन पदाधिकारी व नगर प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे निर्माण झाली आहे.

पाणी जाण्यासाठी नाल्या केल्या नसल्याने प.स.मागील मोगरे लेआऊट मधील नागरिकांच्या घरात पाणी घुसले, पाणी जाण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे घराच्या खालून झरे वाहत आहेत. अंगणातून पाणी वाहत असल्याने अनेक नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती मागील वर्षी सुद्धा निर्माण झाली होती. याबाबत सत्ता पक्षाचे पदाधिकारी प्रत्यक्ष येऊन पाहणी केलेली होती तरी देखील एक वर्षापासून त्यांना नियोजन करण्यासाठी वेळ मिळाला नाही. ही वस्तुस्थिती आज तेही नाकारु शकत नाही. अशीच परिस्थिती गावात अनेक वॉर्डांत आहे. तरी देखील मुल शहर, खूप सुंदर शहर, पुरस्कार प्राप्त शहर म्हणून नावारूपास आले हे विशेष….