यंदा प्रधानमंत्री पीकविमा योजना ‘बीड पॅटर्न’नुसार ३१ जुलैच्या आत काढावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बर्‍हाटे

24

चंद्रपूर
जिल्ह्यात यंदा प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २0२२ मध्ये बीड पॅटर्ननुसार राबविण्यास राज्याच्या कृषी विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील भात, ज्वारी, सोयाबीन, मुंग, उडीद, तूर, कापीस हे पीक अधिसूचित आहेत. त्यांचाच विमा कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी ३१ जुलैच्या आत काढावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी केले आहे.
विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणार्‍या नुकसानीपासून शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टीकोनातून पीक विमा योजना राबविण्यात येते. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे आकस्मात नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत याबाबत

केंद्र शासन पीक विमा अँप, संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी, महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक १८00२६६0७00 यावर कळवावे.

एचडीएफसी इर्गों जनरल इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढण्यात येत आहे. दायित्व एकूण विमा हप्त्याच्या ११0 टक्क्यापयर्ंत असणार आहे.