राजोली येथिल पाणी घरात घुसल्याने लोकांचे मोठ नुकसान

34

सततधार पावसाने तालुक्यातील राजोली येथिल पाणी घरात घुसल्याने लोकांचे मोठ नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत च्या अलगर्जीपणामूळे अशि परिस्थिती निर्माण झाल्याचे येथील नागरीकांचे मत आहे. नियोजन शुन्य कामामुळे हा प्रकार घडला असल्याचे लोकांचे मत आहे.
रस्ताचे सिमेंटीकरण,नालीकाम झाले तेव्हा पावसाळयाचे पाणी कोणत्या बाजुने निघेल याचे नियोजन गरजचे होते.बांधकाम करताना ब-याच ठिकाणी मलबा टाकलेला आहे. तर काही ठिकाणी नाल्यांची उंची रस्तापेक्षा वर असल्याने नाल्याचा उपसा केला नसल्याने सदर प्रकार घडला. असल्याचे बोलल्या जात आहे.
झालेली लोकांची भरपाई ग्रामपंचायत चे नुकसान भरपाई म्हणून द्यावी. अशी येथील ग्रामस्थाचा मागणी आहे. पावसाच्या पहिल्या पाण्यातच जर हे हाल असतील तर पुढे पुर्ण पावसाळा लोकांनी कस जगावर यावर गांभियाने विचार करून पावसाचे पाणी कशा पध्दतीने बाहेर काढता येईल यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्या अशी येथिल ग्रामस्थांची मागणी आहे.