मुल, बल्लारपूर, चिमूर व ब्रह्मपुरी शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांचे अर्ज आमंत्रित

43

चंद्रपूर
सन २0२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर कार्यालयांतर्गत शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने (मॅन्युअली) करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चंद्रपूर, सिंदेवाही, राजुरा, ब्रह्मपुरी येथील मुलांचे वसतीगृह तर चंद्रपूर, मुल, बल्लारपूर, चिमूर व ब्रह्मपुरी येथील मुलींच्या वसतीगृह प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांनी संबंधित गृहपाल यांच्याशी संपर्क साधून अर्ज प्राप्त करून घ्यावे व सदर अर्ज विहित नमुन्यात भरून संबंधित गृहपाल यांच्याकडे सादर करावेत.
ऑफलाईन (मॅन्युअली) प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी शालेय विद्यार्थ्यांसाठी दि. १५ जुलै २0२२ पर्यंत इयत्ता १0 वी व ११ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) दि. ३0 जुलै २0२२ पर्यंत बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका/पदवी आणि एम.ए./एम.कॉम./एम.एस.सी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) दि. २४ ऑगस्ट २0२२ पयर्ंत तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३0 सप्टेंबर २0२२ पर्यंत अर्ज सादर करावे, असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.