चिचाळा येथे आधार नोंदणी शिबीर संपन्न 57 बालकांनी घेतला लाभ

44

मुल:- महिला व बालकल्याण विभाग चंद्रपूर यांचे वतीने ग्रामीण भागातील 0ते5 वयोगटाकरीता एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय पंचायत समिती मूल अंतर्गत दिनांक 04 जूर्ले ते 05 जुर्ले चिचाळा येथे 5 ग्रामीण गावाकरीता आधार नोंदणी शिबीर घेण्यात आले. या शिबिराला ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्फुर्ते सहभाग नोंदविला. आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी ओळखीचा सर्वात विश्वासार्ह आणि महत्वाचा पुरावा बनला आहे.

हयामध्ये कार्डधारकाचे महत्वपूर्ण असे बायोमेट्रिक तपशील आहेत.पाच वर्षाचे होतील तेव्हा त्यांना बायोमेटिक माहिती जसे कि फिंगरप्रिंटस इत्यादी नोंदणीसह करणे आवश्यक आहे.ओळख पुरावा सर्व वयोगटातील लोक त्यांच्या ओळखीचा पुरावा म्हणुन आधार कार्डचा वापर करतात. आधार कार्डचा उपयोग आहे शाळांमध्ये प्रवेश मुलांची ओळख स्थापित करण्यासाठी वापरले जाऊ शकते आधार कार्ड खूप उपयुक्त आहे.

या शिबीरात एकात्मीक बाल विकास अधिकारी निलेश चव्हाण,आंगणवाडी  सुपरवायझर उमरे मॅडम,अंगणवाडी कार्यकता बेबी चलाख,सुशीला भेंडारे,मनिषा गांडलेवार,देवका पिंपळे  ग्रामपंचायत चिचाळा येथील कर्मचारी  सहकार्य केले.
हे शिबीर पंचायत समिती मूल च्या आधार संचालीका आरती पांडे,सहाकारी सोनुले हयांनी चिचाळा,ताडाळा,व कवडपेठ,हळदी येथील लाभाथ्र्यांचा समावेश करून एकूण 57 बालकांचे आधारकार्डची मोफत नोंदणी केली.

ग्रामीण भागात लहान मुलासाठी

आधार नोंदणी शिबीर आयोजीत केल्यामुळे परीसरातील जनतेनी मुल तालुका प्रशासनाचे आभार मानले.