बस ट्रकचा भीषण अपघात वाहक गंभीर जखमी

75
मूल वरुन चंद्रपूर जाणाया वस आणि चंद्रपूर वरून मूल कडे येणाÛया ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची घटना मूल-चंद्रपूर मार्गावर आज (ता. 4 जुर्ले) रोजी 5 वाजता दरम्यान घडली.
परिवहन महामंडळाची बस क्रं. एम एच 40 एक्यु 744 ही मूल बस स्थानकावरुन चंद्रपूरकडे जात होती तर चंद्रपूर वरून ट्रक क्रं. सी जी 04 आय एफ 6044 मूलकडे येत होता, दरम्यान बस आणि ट्रक मध्ये झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार बस चालकाचे दोन्हीही पायाला गंभीर जखम झाली असून, रुग्णवाहिकेने तातडीने त्यांना चंद्रपूरला हलविले आहे. अन्न प्रवाशांना किरकोळ जखमा झाले आहे.
बस चालकांनी विरुद्ध दिशेने जाऊन ट्रकला ठोस मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनास्थळावर मूल पोलीस पोहचुन जखमीना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात हलविले, पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.
गडचिरोली मूल चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावर दररोज दोन ते तीन अपघात होत असल्याने प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे आवश्यक असल्याचे मत आता व्यक्त केले जात आहे.