उश्राळा येथे कृषी संजीवनी सप्ताहची सांगता

22

१५ जून ते ३० जूनपर्यंत कृषी संजिवनी सप्ताह कृषी विभाग, आत्मा व शासकीय यंत्रणेच्या सहभागातून ग्रामीण भागामध्ये राबविण्यात आला. या सप्ताहात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे उपक्रम, संवाद, किसान गोष्टी, बांधावर चर्चा, पीक पद्धती, विकसित कृषी तंत्रज्ञान याबाबत प्रबोधन व रासायनिक खते, कीटकनाशके, बी- बियाणे व सेंद्रिय शेतीचे प्रत्यक्षिक, हवामान बदल व शेतीचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यातील अनेक गावात संवाद कार्यक्रम पार पडल्यानंतर कृषी क्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त समारोपीय कार्यक्रम उश्राळा येथे आयोजित करण्यात आला होता.  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्य तालुकास्तरीय कृषीदिन व पुर्ण आठवडा तालुक्यात विविध कृती केलेल्या कृषि संजीवनी सप्ताहाचा समारोपीय समारंभाचा कार्यक्रम उश्राळा येथे आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून तहसीलदार रविंद्र होळी, अध्यक्ष म्हणून सरपंच देवानंद नामदेव नर्मलवार, प्रमुख अतिथी सरपंच रेवता सोनुले, उपसरपंच तुषार ढोले, माजी सरपंच संतोष रेंगुडवर, टेकाडी सरपंच चौधरी, ठाकरे नायब तहसीलदार, नायब तहसीलदार कुमरे, प्रगतशील शेतकरी दामोधर सोनुले, नामदेव, प्रमोद बोमनवार, प्रगतशील शेतकरी विठ्ठल मशाखेत्री, प्रगतशील शेतकरी प्रशांत बालाजी मेश्राम इत्यादी उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषि अधिकारी भास्कर गायकवाड यांनी सेंद्रिय शेती, शास्वत शेती, संघटन करून शेती करणे व महाडीबीटी प्रक्रियेचे विश्लेषणसखोल करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत उपस्थित शंकांचे निरसन केले.

साहाय्यक पशुधन विकास अधिकारी नंदगिरवार यांनी पशुधन ही काळाची गरज, पशुधनाची योग्य काळजी घ्यावी व पशु विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. शेतकी शाळा सोमनाथचे प्राचार्य गजघाटे यांनी बीज प्रक्रिया, 3टक्के मिठाच्यागिरसावळे, कृषि विभागाचे कर्मचारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

उश्राळा गावाचे ग्रामसेवक मडावी व कृषि सहाय्यक मंत्रीवार, साईनाथ मशाखेत्री व किरनदास किन्नाके यांची टीम यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि सहाय्यक मंत्रीवार यांनी तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी (कृषि) रामचंद्र देशमुख यांनी केले.

दिली विविध योजनांची माहिती पंचायत समिती कृषि अधिकारी किशोर चौधरी यांनी जिल्हा परिषद स्वानीधी योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बीरसा मुंडा कृषि क्रांती योजनांची सखोल माहिती, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयांवर मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. 

अर्क तयार र करण्याचे प्रात्यक्षिक पराते यांनी दशपर्णी अर्क तयार करण्याच्या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर करत दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क वापराचे फायदे या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. कृषि सहाय्यक करकीले यांनी फळबाग लागवड या विषयावर मार्गदर्शन केले.