शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये शिक्षणासोबतच शेतीची आवड :कुलसचिव डॉ. अनिल चिताडे

46

मूल- समाजासाठी कार्य केलेल्या व्यक्तीचे स्मरण करणे हीच खरी प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी आणि गरिबीतूनच ग्रामीण विद्यार्थी प्रगती साधत असतात असे विचार गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल चीताडे यांनी व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा स्व. वि.तू.नागपुरे सामाजिक कार्य सेवा प्रतिष्ठान मुल तर्फे आयोजित स्व.वी.तू.नागपुरे जयंती कृषी व पर्यावरण दीन समारोह कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अतिथी तथा प्रमुख मार्गदर्शक  एन.एच.कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन.एस. कोकोडे यांनी मार्गदर्शन करतांना स्व. नागपुरेजींना दूरदृष्टी व  ध्येयवेडे असल्याने आर्थिक उन्नतीच्या मागे न लागता शिक्षण देऊन समृद्ध समाज घडविण्याचे कार्य केले आहे. तसेच राज्यकर्त्यांचे योग्य नियोजन नसल्याने  जो शेतकरी सर्वांना अन्न देतो त्यालाच आत्महत्या करावी लागत आहे  म्हणून प्रत्येक शेतकरी कुटुंबात एकतरी नोकरी देण्याची गरज आहे.

तेव्हा शिक्षणासोबच शेतीचाही विकास होईल अशी भूमिका स्व.नागपुरे जिंची होती याचे सर्वांनी चिंतन केले पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍड बाबासाहेब वासाडे होते. शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना   नागपुरेजीनी १९४० मधे केली त्यात बी.एस.सी.इंजिनिअरिंग, सोबतच आय.ए. एस.आय.पी.एस.चे क्लासेस सुरु करून संस्था मोठी करण्याचे स्वप्न त्यांचे होते ते पूर्ण करण्याची जबाबदारी प्राध्यापकांची आहे. असे अध्यक्षीय भाषणातून बोलून दाखविले. याप्रसंगी संस्थेचे सदस्य डॉ.राममोहन बोकारे यांनीही नागपुरे यांच्या कार्याला उजाळा दिला.

जयंती निमित्त कृषी व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, तालुक्यातील उत्कृष्ठ शेतकऱ्यांचा आणि शिक्षकाचा सन्मान सोबतच संस्थेतून प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य मुख्याध्यापक, प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी  यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते  शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन  सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक कुलसचिव डॉ.अनिल चीताडे, मार्गदर्शक प्राचार्य डॉ. एन.एस. कोकोडे यांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड.अनिल वैरागडे यांनी केले.

मंचावर माजी प्राचार्य ते.क. कापगते, सदश प्रा.किसन वासाडे, पंचायत प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अविनाश गरपल्लीवार, न.भा.वी.मुख्याध्यापक ए.एच.झाडे,कन्या विद्यालयात मुख्या.मंगला सुंकरवार, राजोली शाळेचे मुख्याध्यापक राजू येणुगवार, अंतर्गावचे एस. डी.भगत,व्याहाडचे ए.जी. कोंडेकर, बल्लारपूर पब्लिकचे विनोद बोलीवार, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.गणपती आगलावे यांनी केले तर आभार महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला असंख्य विद्यार्थी,संस्थेतील शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.