गर्भलिंग निदान व स्वच्छतेवर जनजागृतीपर कलापथक कार्यक्रम

67

प्रतिनिधी/मूल
नगर परिषद मूल च्या वतीने जनकल्याण शिक्षण संस्था मूल अंतर्गत जनकल्याण कला मंचच्या वतीने गर्भलिंग निदान, आरोग्य व स्वच्छता या विषयावर जनजागृतीपर कलापथकाचे कार्यक्रम मूल शहरातील मुख्य आठ ठिकाणी आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन नगर परिषद मूल च्या मुख्याधिकारी मनीषा वजाडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन आरोग्य निरीक्षक अभय चेपुरवार, शाखा अभियंता श्रीकांत समर्थ, जनकल्याण संस्थेचे संचालक राजू गेडाम, नगर परिषद मूलचे आलेख बरापात्रे , अनिल वाडगुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी भ्रूहत्या करणे कायद्याने गून्हा असुन मुलगा मुलगी समान असल्याचा संदेश या कलापथकाच्या माध्यमातुन देण्यात आला.

याबरोबरच स्वच्छ्ता व आरोग्य या विषयावर उद्बोधनपर कलासंचाच्या माध्यमातुन देण्यात आले. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी १८ वर्ष पुर्ण झालेल्या युवक युवतींनी आपले नोंद करण्याचे आवाहन कलपथकाच्या माध्यमातुन देवुन मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

कलापथक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनकल्याण कला मंच मूल चे कलावंत अमोल वाळके, बंडु अल्लीवार, शशिकांत गणवीर, रवि वाळके, प्रज्ञा निमगडे, पौर्णिमा गेडाम आदींनी परिश्रम घेतले.