एम्प्लॉयमेंट रोजगार नोंदणी कार्ड अद्ययावत करा -सहायक आयुक्त भैय्याजी येरमे

42

चंद्रपूर :- बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने जिल्ह्यातील बेरोजगार तरुण- तरुणींनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या www.ma- या haswayam\gov\in संकेतस्थळावर अद्याप रोजगार नोंदणी कार्डची नोंदणी केली नाही किंवा अद्ययावत केले नाही.

अशा उमेदवारांनी आधारकार्ड, नावात बदल, पत्ता, मोबाइल नंबर, शैक्षणिक पात्रता याबाबतची माहिती नमूद संकेतस्थळावर जाऊन अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

उमेदवारांचा जुना यूजर आयडी, रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड टाकून खाते उघडावे.

आपला आधार क्रमांक व माहिती अचूक टाकल्यानंतर सबमिट करा. आपल्या मोबाइल त्यानंतर नंबरवर आलेला ओटीपी टाकून पुनःश्च सबमिट करावे. त्यानंतर माहिती उमेदवारांनी भरून पासवर्ड तयार करावा व तो सबमिट करावा.

त्यानंतर उमेदवारांनी नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावर युजर आयडी व पासवर्ड येईल. त्यानंतर मुख्य पानावर जाऊन यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगीन करावे. • माहिती भरून प्रिंट काढता येईल.