मुल येथे योग जनजागरण यात्रा उत्सहात,योग की धून,करा योग,रहा निरोग‘

34
योग दिनानिमित्त मुल  शहरात रॅलीचे   आयोजन 
योगऋशी परमपूज्य स्वामी रामदेव महाराज यांच्या प्रेरणेने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून संयुक्त राश्ट्र महासंघात 21 जूनला आंतरराश्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा ठराव संमत झाला. या वर्शीही 21 जुनला पतंजली  योगसमिती मुल, चे वतीने  मुल  शहरात रॅलीचे 20जुनलाआयोजन करण्यात आले, योगभवन, क्रिडा संकुल,मुल येथुन रॅलीला सुरवात झाली. समितीचे अध्यक्ष प्रभाकर भोयर, ऊपाध्यक्ष अनिल गांगरेडीवार, गणेशभाऊ मांडवकर, गुरुदेव बोदलकर, बट्टे सर, नामदेवराव गांवतुरे, नाशिकला गांवतुरे, सामाजिक कार्यकर्त्यांना,मुल साहीत्यीक 
सुखदेव चौथाले,   सचिव  दिलीप पोकळे, सुरेश खियानी चेतन कवाडकर,  गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष, प्राचार्य,  रत्नमालाताई भोयर, माजी नगराध्यक्ष, मुल योगसमितीच्या अध्यक्षा सौ. पोकळेताई,  कोतकोंडावार ताई, प्रभा चौथाले, माजी नगरसेविका,  अल्काताई कामडी, जयश्री चनुरवार,  ऊपस्थित होते.
रैलीत ‘स्वस्थ भारत!समृध्द भारतः स्वच्छ भारत!निरोगी भारत,21 जून योग की धून,करा योग,रहा निरोग‘आदी सामाजिक योग संदेष देण्यात आला.
रॅलीद्वारे करो योग, रहो निरोग,  असा संदेश देण्यात आला, या रॅलीत गुरुदेव  सेवा मंडळाचे कार्यकर्ते, पतंजली योगसमितीचे योगसाधक, व गांवातील प्रतिष्ठित  महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत रॅलीचा कार्यक्रम  मोठ्या उत्साहात पार पडला.