१४ जून ते १४ जुलै या कालावधीत नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण-के. व्ही. राठोड

71

चंद्रपूर
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता चंद्रपूर येथे नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. १४ जून ते १४ जुलै २0२२ या कालावधीत करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमांमध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, उद्योगसंधी मार्गदर्शन, उद्योगाची निवड, यशस्वी उद्योजकांचे अनुभव व कथन, शासनाच्या व महामंडळाच्या विविध कर्ज योजनांची माहिती, जिल्हा उद्योग केंद्राच्या कर्जविषयक योजना, आयात-निर्यात, सिद्धी प्रेरणा व डिजिटल मार्केटिंग आदी विषयांवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तरी, इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती व प्रवेशाकरिता दि. ९ जून २0२२ पूर्वी प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड ९४0३0७८७७६ व कार्यक्रम समन्वयक लक्ष्मी खोब्रागडे ९३0९५७४0४५ या क्रमांकावर किंवा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कार्यालयाच्या 0७१७२-२७४४१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड यांनी केले आहे.