मूल बस स्थानकावरील प्रवाशी महिलेचा मृत्यू

47
मुल :- 
श्री मनोज कर्रेवार हा मिस्त्री कामासाठी  बाहेरगावी काम करत होता. दोन दिवसांपूर्वी तो मारोड्याला परत आला. त्याने आपल्या पत्नीसोबत गावाला जाण्यासाठी निघाला असता बस च्या धडकेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात शोक पसरलेला आहे. मुल च्या बस स्थानकावर या पूर्वी अशीच एक दुर्दैवी घटनेत एका महिला प्रवासी मृत्यू झाला होता.
मारोडा गावच रहिवाशी श्री  मनोज कर्रेवार हा आपल्या कुटूंबा सोबत गावाला जाण्याासाठी मूल बस स्थानकावर होता. आज दि. 5/6 /2022 ला  दुपारी 1 च्या सुमारास अचानक बसच्या धडकेत श्री मनोज कर्रेवार ची पत्नी सौ. सरिता मनोज कर्रेवार वय अ.26 वर्षे याचा मृत्यू झाला. घटना स्थळी मुल पोलिसांनी पंचनामा करून पी एम साठी मुल रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहे.