शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे

60

दहावीनंतर लवकरात लवकर हाती रोजगार असावा आणि मुलाने स्थापित व्हावे, या उद्देशाने पालक पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाकडे वळतात. तीन वर्षांतील ही पदविका अभियंता म्हणून मुलाला रोजगारक्षम बनवते. यंदा तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सर्व कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत.

कागदपत्रांची जुळवाजुळव मे महिना संपत आला की, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची लगबग सुरु होते, हेच लक्षात घेऊन तंत्रशिक्षण संचालनालयाने नवीन शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५ ते २० दिवस आधीच प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

ही तयार ठेवा कागदपत्रे जात-जमात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, ३१ मार्च २०२० ते २०२३ पर्यंत वैध अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र, दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र, सैन्यदलातील प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र, अल्पसंख्याकांसाठी प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र, आधार क्रमांक व संलग्न बँक खाते.