मूल बस स्थानका समोर होते नेहमी वाहतुकीची कोंडी

56

मूल (प्रतिनिधी)
बस स्थानका समोरील दारू दुकान आणि हाँटेल मध्ये जाणारे ग्राहक महामार्गावर वाहन उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करीत असल्याने सदर ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असुन बस चालकांना नाहक ञास सहन करावा लागत आहे.
मागील तीन वर्षा पासुन निर्माणाधिन असलेले येथील बस स्थानक चंद्रपूर, गडचिरोली, ब्रम्हपूरी, गोंडपिपरी, चिमूर आणि चामोर्शी मार्गाच्या मध्यभागी आहे. त्यामूळे येथील बस स्थानक आणि बस स्थानका समोरील महामार्ग नेहमी गजबजलेले असते. येथून धावणा-या एस.टी.बसेसच्या फे-या मोठया संख्येनी असल्याने दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असतात.

बस स्थानका समोरून गेलेल्या चंद्रपूर गडचिरोली महामार्गाच्या दोन्ही बाजूला उपहारगृह, पान मंदिर असे विविध व्यापारी प्रतिष्ठाने निर्माण झाली असून स्थानका समोरचं आँटो रिक्षा व चार चाकी वाहणांशिवाय खाजगी प्रवासी वाहतुक करणारे वाहण सुध्दा उभी राहतात. प्रवासी वाहतुक करणारी खाजगी वाहण बस स्थानकापासून दोनशे मिटरपेक्षा जास्त अतंरावर उभी ठेवल्या जावी, असे नियम आहे, परंतू या नियमाचे उल्लंघन करून खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या ट्र्ँव्हल्स बसेस व इतरही वाहण ऐन बस स्थानका समोरचं उभी ठेवली जातात.

नव्याने निर्माण होत असलेल्या येथील बस स्थानकामध्येे गडचिरोली आणि ब्रम्हपूरीकडून येणा-या एस.टी.बसेसला स्थानकाच्या डाव्या बाजूने आंत जाण्याचा मार्ग आहे, तोच मार्ग स्थानकामधून बाहेर निघणा-या सर्व एस.टी.बसेसकरीता निश्चित करून दिला आहे. स्थानका मधून बाहेर निघण्याच्या ऐन चंद्रपूर मार्गावर अलीकडेच एक बार अँण्ड रेस्टारंट, उपहार गृह, बेकरी व खानावळ असल्याने या दुकानांसमोर नेहमी दुचाकी व चारचाकी वाहण उभी ठेवली जातात. सदर मार्गावर नेहमी वाहण उभी ठेवली जात असल्याने बस स्थानकामधून चंद्रपूर कडे जाणा-या एस.टी.बसेसला प्रत्येक वेळेस वळण घेतांना चालकाला त्रास सहन करावा लागतो. सदर मार्गावरून बस वळवतांना उभ्या राहणा-या वाहणांमूळे चालकांना कसरत करावी लागत असून ब्रेक न लागल्यास किंवा अचानक एक्सलेटर वाढल्यास केव्हाही मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महामार्गावरील वाढत्या गर्दीमूळे आजपर्यंंत अनेक अपघात घडली असून वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारे वाहतुक शिपाई स्थानिक गांधी चौकात कर्तव्य बजावत असतात. मात्र वाहतुकीची कोंडी होणाऱ्या बस स्थानकासमोर ते बघ्याची भूमीका घेत असल्याने त्यांच्या कर्तव्याप्रती प्रश्न निर्माण होत आहे.

त्यामूळे बस स्थानका समोर होणारी नेहमीची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनाने येथील बस स्थानकासमोर किमान एक वाहतुक शिपाई नियुक्त करून त्याच्या माध्यमातुन महामार्गावर वाहन उभी करून पोटपुजा करणाऱ्या वाहण चालकांसह दुकानात येणाऱ्या ग्राहकांना वाहण उभी ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून न देणाऱ्या विक्रेत्याविरूध्द कारवाईचा बडगा उभारल्यास याठिकाणी होणारी नेहमीची वाहतुक कोंडी कायमची दुर होईल. असा विश्वास शहरातील सुज्ञ नागरीकांना आहे.