टाटा ट्रस्ट आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने कोसंबी येथे आरोग्य शिबीराचा लाभ

24

कोसंबी येथे मंगळवार, दिनांक : 24 मे 2022 ला टाटा ट्रस्ट आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने मोफत मार्गदर्शन, तपासणी व उपचार शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हिपाटायटीस बी, सी. मुख कर्करोगाची तपासणी करण्यात आली. गावातील लोकांचा उत्सफुर्त असा सहभाग मिळाला आणि १०० लोकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला.
आरोग्य शिबीराचे प्रमुख डॉ सुरज सर होते. डेंटिस्ट वैधयी लोखंडे, स्टाफ नर्स अदिती निमसरकार, धम्मज्योती मुरमुरकर तर डाटा एन्ट्री आपरेटर संयोजा वनकर होत्या.
शिबिराचे उद्घाटन कोसंबी येथील सरपंच माननीय रविंद्र कामडी यांचे शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी सरपंच महोदय यांनी गावातील सर्व जनतेला शिबिराचं लाभ घेण्याचे व व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. कर्करोगाला कारणीभूत आहे व्यसनच हे आपल्या मार्गदर्शनातून समजावून दिले. संपूर्ण टिमला पूर्ण सहकार्य करण्याची हमी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुरज सर यांनी केले. आजारांपासून दूर राहण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उपस्थित ग्रा.पं.चे उपसरपंच सारिका गेडाम,ग्रा.पं.चे सचिव सुरज आकनपल्लीवार, ग्रा.पं.सदस्या सौ.चंदाताई विनोद कामडी, सुवर्णा कावळे, अरूणा वाढई, रोशनी मोहुलै, मनिष चौधरी, गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष महाराज गुरनुले, पोलिस पाटील, तंटामुक्त गाव समिती, महाकाली महिला ग्रामसंघ कोसंबी ,आय. सी. आर पी. वेदिका सोनुले, करिष्मा गेडाम, ज्ञानेश्वरी चौधरी, कृषी मित्र बंडु वाढई, जेष्ठ नागरिक माधवराव सोनुले, नारायणराव गिरडकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक विनोद कामडी, अनिल वाढई, धनराज मोहुलै, पुंडलिक गिरडकर, डेव्हिड गेडाम, राकेश मोहुलै, सुधाकरचहारे, गणेश साठोणे, छत्रपती मोहुलै, सावित्रीबाई फुले वाचनालय मंडळ, सर्व बचत गटाच्या सदस्या, महिला मंडळ, युवती मंडळ, युवक मंडळ, ग्रा.पं.चे सर्व कर्मचारी, रोजगार सेवक, आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांचे आरोग्य शिबीराला मोलाचे सहकार्य लाभले.
शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ. निता दुधे CHO कोसंबी, मडावी आरोग्य सेवक, रेखा बोरकुटे आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक प्रशांत गटलेवार यांनी केले तर आभार सुरज आकनपल्लीवार ग्रामसेवक यांनी मानले.
या शिबिरात ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेण्यासाठी गावकरी उपस्थित होते.