मूल येथे बाल काव्यकुंजचे लोकार्पण

26

मूल : झाडीबोली साहित्य मंडळ महिला शाखा मूलच्या अध्यक्षा शशिकला नामदेवराव गावतुरे यांच्या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे लोकार्पण मूल येथे गावतुरे भवनात नुकतेच करण्यात आले.

बालकांसाठीच लिहिलेला हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह असून लहान बालकांच्या उपस्थितीत या काव्यसंग्रहाचे लोकार्पण करण्यात आले.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय सिध्दावार, समाजसेवक नामदेव गावतुरे, गणेश मांडवकर, कवयित्री शशिकला गावतुरे, कवी लक्ष्मण खोबरागडे उपस्थित होते.

बाल काव्यकुंज काव्यसंग्रहात एकूण ५५ पद्य रचना असून या संग्रहास गडचिरोली येथील कवी प्रमोद बोरसरे यांची प्रस्तावना लाभली आहे. संचालन नामदेव पिजदूरकर यांनी केले तर आभार विजय लाडेकर यांनी मानले.