अकराव्या शतकातील यादवकालीन शिल्प भेजगाव येथे सापडले….

22

भेजगाव  :-  चंद्रपूर जिल्ह्याला मुल तालुक्यातील  ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जिल्हयात अनेक ऐतिहासिक वास्तू आजही उभ्या आहेत. मात्र मंगळवारी, जिल्हयाचा इतिहासात अधिक भर पडली.

भेजगाव येथील मामा तलावाच्या खोदकामादरम्यान अकराव्या शतकातील यादवकालीन शिल्प आढळले आहे.

या तलावाच्या पाळीवर जीर्ण मात्र देखणे हेमाडपंथीय मंदिर आहे. या शिल्पात एका रेड्यावर अथवा मेंढ्यावर गदाधारी पुरूष मांडी घालून बसलेला दिसतो. त्याच्या डाव्या हातात गदा आहे. शिल्प जीर्ण झाले आहे.

त्यामुळे हे शिल्प नेमके कुणाचे हे सांगणे जरा कठीण असल्याचे मत इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केले. अकरा, बाराव्या शतकात चंद्रपूरचा काही भाग यादवांचा सत्तेखाली होता.

सत्ताकाळात यादवांनी अनेक हेमाडपंथीय मंदिरांची निर्मिती केली होती.