डोंगरगांव येथील युवकाने गळफास घेवुन आत्महत्या

41

मूल :- तालुक्यातील डोंगरगांव येथील एका युवकाने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना रात्रौ 2 वाजता दरम्यान उघडकीस आली. राहुल अरुण वेठे वय 30 वर्षे असे गळफास घेतलेल्या युवकाचे नांव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 6 व 8 वर्षांचे दोन मुल आहेत मूल पोलीस घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला, पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.