युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

45

मूल: येथील क्वॉलिटी इलेक्ट्रीकचे मालक नरेश बोमनवार यांचे लहान बंधु अमोल बोमनवार यांनी स्वतःच्या राहत्या घरी सिलींग  फॅनला गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी 3 वाजता दरम्यान उघडकीस आली.

मूल तालुक्यातील टेकाडी येथील अमोल बोमनवार हे व्यवसायाच्या निमीत्याने मूल येथे राहात होते, त्यांचा मूल येथील नागपूर मार्गावर रिवायडींगचा व्यवसाय होता. आज दुपारच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले.

आत्महत्या करण्याचे नेमके कारण अद्याप कळु शकले नाही. घटनास्थळावर मूल पोलीस दाखल होवुन पंचनामा केला. व पार्थीव उतरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयत नेण्यात आले आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.