मुलींची पायपीट थांबणार,‘मानव विकास मिशन’अंतर्गत सायकली वाटप

108

मूल  :- शिक्षणाच्या सुविधा नसल्याने आजही पायपीट करून शिक्षण घ्यावे लागते. या पार्श्वभूमीवर मानव विकास मिशन अंतर्गत  मुलींना सायकली वाटप करण्यात आल्याने आता त्यांची पायपीट थांबणार आहे.  विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले मूल येथील सुभाष प्राथमिक शाळेत शालेय मुलींना मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत सायकलीचे वाटप शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ प्रा. मारोतराव पल्लावार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी समितीचे उपाध्यक्ष भावना चौखुंडे, मुख्याध्यापक अविनाश जगताप, पालक अरुण चौखुंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना शाळेत वेळेवर येऊन शिक्षण घेता यावे, यासाठी सायकल दिल्या शाळा व्यवस्थापना जातात. हा शासनाचा स्तुत्य उपक्रम असून मुलींना अभ्यासाविषयी आपुलकी नक्कीच निर्माण होईल, असा विश्वास प्रा. पल्लावार यांनी यावेळी व्यक्त केला. संचालन सहायक शिक्षक बंडू अल्लीवार, तर उपस्थितांचे आभार योगेश पुल्लकवार यांनी मानले.