मूल : महापुरुष तणाने काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्यांचे विचार आजही समाजाला नवी दिशा दाखवत अमर आहेत. अश्याच एका समाजोपयोगी विचाराने प्रेरीत होऊन महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांची कास धरून सुरू झालेली सत्यशोधक विवाहाची परंपरा मूल तालुक्यातील रत्नापूर येथे जपल्या गेल्याने या नवदाम्त्यांचे समाजातल्या सर्वच स्तरातून कोतुक केले जात आहे. अलीकडील कर्मकांडाला फाटा देत मूल वैवाहीक तालुक्यातील रत्नापूर येथे सत्यशोधक विवाह सोहळा हजारो लोकांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.
पोंभु्णा तालुक्यातील डोंगरहळदी येथील शेवंता व शत्रुघ्न लेनगुरे यांचे चिरंजीव सोनल आणि मूल तालुक्यातील रत्नापूर येथील रेखा व सुखदेव वाडगुरे यांची कन्या अनुराधा यांनी महात्मा जोतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना वंदन करून त्यांनी दिलेल्या विचारांची कास धरून सत्यशोधक पद्धतीने विवाह करून सहजीवनाच्या आयुष्याची सुरुवात केली.
अनुराधा आणि सोनल यांनी जीवन जगताना जे काही कडूगोड अनुभव येतील ते सर्व स्विकारून आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली.पुरोगामी विचाराचे अभ्यासक डॉ. राकेश गावतुरे यांनी मनोगत व्यक्त करताना सत्यशोधक विवाह पध्दतीचे समाजाने अनुकरण करावे, असे आवाहन करून सोनल लेनगुरे आणि अनुराधा वाडगुरे यांच्या पालकांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याच्या प्रस्तावाचा स्विकार केला. त्याबद्दल त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला. तसेच सोनल आणि अनुराधा या दाम्पत्याचेही कौतुक केले.
कोणताही मुहूर्त, अक्षदा आणि वाजाविना शेकडो नागरिकांच्या साक्षीने पार पडलेल्या सोहळयात सोनल आणि अनुराधा वैवाहीक बंधनात बांधल्या गेले. केवळ महापुरुषांनी मानवाच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची आठवण करीत विचारांचे अमृत पाजत महात्मा जोतिबा फुले रचित मंगलाष्टके म्हणून अनोख्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांचा सत्कार केला. डॉ. समीर कदम यांनी सोनल आणि अनुराधा यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा लावताना उपस्थितांना माहिती दिली. यावेळी वरवधु पक्षाकडील आप्तस्वकीय आणि पाहुणे मंडळीसह श्रीकांत शेंडे, विजय ढोले, जनार्धन लेनगुरे, विकास टिकले, रोहित निकुरे, डॉ. दीपक जोगदंड आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.