गजबजलेल्या कुणबी मोहल्लात अचानक आग; तनसीचा नुकसान

32

मुल:- 

शहरातील  कुणबी मोहल्ला वार्ड क्र. 4  परिसरातील तनीसीच्या ढगाला अचानक आग लागली. जगदिश भगवान चिताडे यांच्या जनावाराचा चारा जळल्यामुळे तनसीच्या ढगाला आग लागली भाजपाचे कार्यकर्ते प्रशांत बोबाटे यांनी  नगरपरिषदेला माहिती दिली  नगरपरिषदेचे कर्मचारी अभय चेपूरवार यांनी अग्निशमन दलाच्या गाडी पाठवली व आग विझविण्याचा पर्यन्त केला तरी पण जनावाराचा चारा जळल्यामुळे तनसीचा ढग जळून खाक झाला होता त्यामुळे जगदीश चिताडे यांच्या जनावराच्या चार्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे आगीचे कारण अजूनही समजले नाही व खुप मोठ्याप्रमाणात जिवीत हानी टळली.या आगीत आग विझविण्यासाठी अग्निशमन बंब दाखल झाले.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून  तनसी चे नुकसान झालयं. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट .