मधमाशांचा बंदोबस्त करा- राकेश रत्नावार

53
मूल शहरातील अंत्यविधी करिता उमा नदी जवळ सुसज्ज अशी स्मशानभूमीची निर्मिती करण्यात आली. याच स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मूलचे नागरिक प्रेत नेत असतात. अशा दुःखाच्या परिस्थितीत गेल्या काही दिवसापासून स्मशानभूमीतील झाडांवर मधमाशांचे पोळे असल्याने अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
स्मशान भूमीत प्रेताचे अंत्यसंस्कार केल्यावर अग्नीच्या धुरामुळे उडून आलेल्या मधमाशा नागरिकांवर हल्ला करुन जखमी करीत आहे. नागरिकांना मधमाशापासून आपला जीव वाचवीन्यकारिता स्मशान भूमिला लागून असलेल्या नदीत उडी मारावी लागत आहे. त्यामुळे जीव जाण्याची शक्यता नाकारता येतनाही.
ही वस्तुस्थिती असून याबाबतची कल्पना स्थानिक प्रशासनातील कर्मचाऱ्यांना आहे.
स्मशानभूमीतील मधमाशामुळे मूल शहरातील नागरिक मधमाशांच्या दहशतीत असून अंत्यसंस्कारासाठी जायचे की नाही असा प्रश्न नागरिकांना निर्माण झाला आहे. मधमाशामुळे नागरिकांची जीवितहानी झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिक प्रशासनाची राहील. ही गंभीर बाब असून स्मशानभूमीतील मधमाशांचा बंदोबस्त करण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन संजय गांधी निराधार योजना मूल चे अध्यक्ष, मूल नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष,काँग्रेस नेते राकेश रत्नावार यांनी नगरपरिषदेला दिले आहे.