सिंदेवाही :-
ग्रामसेवक रामकृष्ण इरपाते हे गुंजेवाही वरून युनिकॉन दुचाकी क्रमांक एम एच 34 ए डब्ल्यू 64 53 या गाडीने येत असताना टाटा एस ऑटो क्रमांक एम एच 36 एफ 931 या गाडीला जोरदार समोरा समोर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शहरापासून जवळच पाथरी रोड वरील शासकीय आयटीआयच्या जवळ झालेला भीषण अपघातात सरडपार गुंजेवाही येथील ग्रामसेवक रामकृष्ण इरपाते यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की सरडपार येथील ग्रामसेवक रामकृष्ण शामराव इरपाते वय 40 वर्ष रा. मेंडकी ता. ब्रह्मपुरी यांच्याकडे गुंजेवाही येथील ग्रामपंचायत ग्रामसेवकाचा प्रभार होता.
अपघाताचे घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश घारे व त्यांचे चमू तात्काळ घटनास्थळी जाऊन भेट दिली व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना करीता सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले .
घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती येथील कर्मचारी व ग्रामसेवक बघण्याची दवाखान्यात गर्दी केली होती सदर घटनेची पुढील चौकशी पोलीस स्टेशन करीत आहे.