गडीसुर्ला येथे मेंढपालवर बिबट्याचा हल्ला

22

 

मुल तालुक्याची विरई फिरकुंटी जवळ गडीसुर्ला येथील शेतशीवारात  मेंढपाळावर मेंढ्यांचे कळप बसले असताना बिबट्याने अचानक येऊन हल्ला करून जखमी केले असल्याची घटना आज दिनांक 19 एप्रिल 2022 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सदर प्रकरणात गंभीर जखमी असलेले मेंढपाल विलास लच्छना अल्लीवार यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मुल येथे  नेण्यात आले असून पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्राद्वारे मिळाली आहे.