PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये कधी जमा होणार?? चला जाणून घेऊया

24

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने मार्फत (PM Kisan Yojana) केंद्र सरकार दरवर्षी देशातील करोडो शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. प्रत्येकी दोन हजार रुपये असे 3 हप्त्यात एकूण सहा हजार रुपयांची रक्कम सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवते.

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसानच्या पुढच्या हप्त्याची म्हणजेच 11व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आतापर्यंत एकूण दहा हप्ते शेतकऱ्यांना पाठवण्यात आले असून, शेवटचा हप्ता 1 जानेवारी 2022 रोजी ट्रान्सफर करण्यात आला होता. त्यानंतर आता पीएम किसानचा 11 वा हप्ता या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाऊ शकतो.याद्वारे केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांना दोन हजार रुपये ट्रान्सफर केले जातील.

eKYC बाबतचे ‘हे’ अपडेट जाणून घ्या!
तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये मिळत असतील, तर eKYC बद्दल जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सरकारने शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देत ​​नुकतीच eKYC ची शेवटची तारीख वाढवली होती. त्यामुळे कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी eKYC करण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती, मात्र आता ती 31 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पीएम किसान योजना: नाव कसे जोडायचे?
स्टेप 1: पीएम किसान योजनेच्या https://www.pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊन शेतकरी त्यांचे नाव पीएम किसान योजनेमध्ये जोडू शकतात.
स्टेप 2: तुम्हाला अधिकृत पीएम किसान योजनेच्या मेन पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ‘फार्मर्स कॉर्नर’ वर जावे लागेल.
स्टेप 3: आता तुम्हाला ‘नवीन शेतकरी नोंदणी’ हा पर्याय निवडावा लागेल.
स्टेप 4: स्क्रीनवर नोंदणी फॉर्म दिसेल.
स्टेप 5: फॉर्मवर तपशील एंटर करा.
स्टेप 6: आता तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.