भिषण अपघात २ ठार तर ६ गंभीर जखमी चंद्रपूर-मूल मार्गावर चिचपल्ली जवळ

34

कार्यक्रम आटोपून कुटुंबासह चामोर्शीला जात असताना चारचाकी वाहनाच्या समोर जनावरे आल्याने झालेल्या भिषण अपघातात २ जण जागीच ठार झाले तर ६ जण गंभीर जखमी झाल्याची घटना चंद्रपूर-मूल मार्गावरील चिचपल्लीजवळ घडली.
चामोर्शी येथील पोलीस कर्मचारी अनिल पारखी यांच्या मोठया भावाच्या पुण्यस्मरण कार्यक्रम चंद्रपूर येथे आयोजीत केला होता, सदर कार्यक्रमाला अनिल पारखी यांनी कुटुंबासह चंद्रपूर येथे गेले होते, कार्यक्रम आटोपुन गुरूवारी रात्रौ १० वाजता दरम्यान चामोर्शी येथे चारचाकी वाहन क्रं. एमएच ३३ व्ही ९६८८ ने जात असताना चिचपल्ली जवळ चारचाकी वाहनाच्या समोर जनावरे आल्याने झालेल्या भिषण अपघातात किरण पारखी वय ३२वर्षे व शोभा पारखी वय ६५ वर्षे या सासु सुनेचा जागीच मृत्यु झाला. तर अनिल पारखी वय ४० वर्षे, साधना पारखी वय ४५ वर्षे राम पारखी वय ७ वर्षे आराध्या पारखी वय ४ वर्षे, ओम १० व नंदिनी १४ वर्ष हे जखमी झाले आहे. जखमीना चंद्रपूरच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.