एफ.ई.एस.गल्स॔ काॅलेज, चंद्रपुर येथे संविधान जागर कार्यक्रम संपन्न

44

फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर द्वारा संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथील रासेयो विभाग द्वारा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती चे औचित्य साधुन दिनांक १३/०४/२०२२ रोज़ बुधवार ला संविधान जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक डॉ प्रमोद रेवतकर, प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक प्रा.डाॅ.इसादास भड़के,प्रा डॉ सुखदेव उमरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे,सह रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ सुवणा॔ कायरकर यांची प्रामुख्यानी उपस्थिति होती.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक डॉ प्रमोद रेवतकर यानी संविधान हा देशाचा राष्ट्रीय ग्रंथ आहे, संविधानाने देशाला स्वंतत्रता,समता बंधुत्व व न्याय सामाजिक मुल्य दिले,तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक प्राध्यापक डॉ इसादास भड़के यानी डॉ बाबासाहेबा च्या संविधानाचे मुल्य विद्याथिनी आपल्या जीवनात अनुसरण करावे व एकदा तरी संविधान चे वाचन करावे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्यवर प्रकाश टाकला,प्रा, डॉ सुखदेव उमरे कार्यक्रमाला अनुसरुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी श्रमीकाच्या कामाचे तास कमी केले व महिला चला हिताच्या दृष्ठीने हिंदुकोड बिल माडले व सोबतच संविधानावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे,प्रा.डाॅ सुवर्णा कायरकर यानी केले
मान्यवराच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले
कार्यक्रमाची सुरवात राष्ट्र गिताने करण्यात आली.
डॉ सुवर्णा कायरकर यानी संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करुण उपस्थिताना संविधानाची शपथ दिलीकार्यक्रमाचे सुत्र संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे तर आभार प्रदर्शन सह रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ सुवणा॔ कायरकर यानी केले
कार्यक्रमास प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्याथिनी उपस्थित होते
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात रमेश गुरुनुले, बंडू वरवाडे यानी केले