तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त मतदारास मतदार ओळखपत्र वितरीत

46

आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणून 31 मार्च हा दिवस जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ३१ मार्चच्या आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्ताने मा. तहसीलदार मुल यांचे हस्ते तृतीयपंथी मतदारास मतदार ओळखपत्र वितरीत करण्यात आले.

तहसिल कार्यालय मुल येथे तहसिलदार डाॅ.रविंन्द्र होळी साहेब ,नायब तहसिलदार पृथ्वीराज साधनकर साहेब,निवडणूक कार्यालयातील लिपीक अमोल करपे हयांच्या उपस्थितीत परवीना रामदास धुडेपाकेवार मतदार ओळखपत्र वितरीत करण्यात आले.मा.तहसिलदार साहेब हयांनी ज्या काही शासकीय योजना असतात त्यांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे बोलत होते.

AC NO – 72
PART NO – 113
SR NO – 1034
Voter Name – परवीना रामदास धुडेपाकेवार
Voter Name En – Parvina Ramdas Dhudepakewar
ID CARD NO – SRO7152887
GENDER – T
AGE – 34

सर्व पात्र तृतीयपंथीय नागरिकांची मतदार यादीत नोंदणी करणे हे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उद्दिष्ट आहे. 

तृतीय पंथीयाकडे आवश्यक कागदपत्रे असलेली कमतरता लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने त्यांना कागदपत्रांबाबत सवलत देवू केली आहे. 18 ते 21 वयोगटातील ज्या तृतीय पंथी व्यक्तीकडे वयाचा कोणताही पुरावा नसेल तर त्यांच्या गुरु मॉ ने दिलेले प्रमाणपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते.

तसेच 21 वर्षावरील तृतीय पंथीयाने वयाचा पुरावा म्हणून स्वत:चे वय सांगणारे प्रमाणपत्र दिल्यास ग्राह्य धरले जाते. तसेच पत्त्याचा पुरावा म्हणून संबंधित व्यक्तींच्या नावे सध्याच्या निवासस्थानी आलेले टपालसुध्दा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते.