Home आपला जिल्हा बोरचांदली पुलाजवळ मेटॅडोर आणि दुचाकीच्या अपघातात दोघेही ठार

बोरचांदली पुलाजवळ मेटॅडोर आणि दुचाकीच्या अपघातात दोघेही ठार

189

 मूल : तालुक्यातील बोरचांदली पुलाजवळ मेटॅडोर आणि दुचाकीच्या अपघातात एक ठार, तर एक गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता. ३०) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. चांदापूर येथील विनोद नागापुरे, अविनाश गेडाम हे दोन युवक दुचाकीने मूलकडे येत होते.

मूल येथून चामोशीकडे जाणारा मेटॅडोर यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे तर दुसरा गंभीर जखमी झाल्याने त्याला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक दाखल उपचाराकरिता दाखल करण्यात आले

त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आलेअसता तिथे मृत्यू झालेला आहे..