गॅस धारकांना सिलेंडर उपलब्ध करून दया-मूल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्ष सौ अर्चना मार्कंडी चावरे

30

मूल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्ष सौ अर्चना मार्कंडी चावरे तथा संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्य यांनी आज दिनांक 16-3-2022ला मूल शहरातील संजय फ्लेम गॅस एजन्सी कडून गॅस धारकांना सिलेंडर उपलब्ध करून देण्याबाबत माननीय तहसीलदार होळी साहेब निवेदन दिले मूल गॅस सिलिंडरचा पुरवठा होत नसल्याने शहरातील गॅस धारकांना गॅस एजन्सीकडून त्रास सहन करावे लागत आहे त्यामुळे गोरगरीब नागरिक त्रस्त झाली असून एकीकडे केरोसीन बंद असल्याने व दुसरीकडे वनविभागाकडून लाकूड काड्या मिळत नसल्यामुळे सिलेंडर अभावी उपाशी राहण्याची वेळ आली आहे यासाठी गॅस एजन्सी वाल्यांना वेळेवर सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावे असे निवेदन महिलांच्या माध्यमातून देण्यात आले यावेळी मूल महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष जयश्री झरकर वार्ड अध्यक्ष आशा चिताडे चंदाताई कारेकर व कल्पना ताई मेश्राम अर्चना मेश्राम सपना करकडे मंदा ताई दूधकोवर व इतर महिला उपस्थित होत्या.