Home आपला जिल्हा Breaking News जानाळाजवळ ट्रॅक आणि हायवाची समोरासमोर धडक

जानाळाजवळ ट्रॅक आणि हायवाची समोरासमोर धडक

106

मूल, ता. १५ : चंद्रपूर-मूल मार्गावरील जानाळाजवळ ट्रॅक आणि हायवाची समोरासमोर धडक बसली. यात दोन्ही वाहन चालक जखमी झाले.

ही घटना मंगळवारी (ता. १५) पहाटे पाच वाजतादरम्यान घडली. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

चंद्रपूर येथून मूलकडे एम एच ३४ बीजी ३८७८ हा ट्रक येत होता, तर मूल येथून चंद्रपूरकडे एम एच ३४ बीजी ७२९९ या दोन वाहनामध्ये जानाळाजवळ समोरासमोर धडक बसली.

या घटनेमध्ये ट्रक आणि हायवाचे मोठे नुकसान झाले. दोन्ही वाहनाचे चालक जखमी झाले. जखमीना मूल येथील उपजिल्हारुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जानाळापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर आठ दिवसांत तीन अपघात घडले.