छायाचित्रकारांनी केले महिलांचा सन्मान

48

जागतिक महिला दिनानिमित्य मुल तालुका छायाचित्रकार संघटना यांचे विद्यमाने मुल तालुक्यातील विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व युवतींच्या कन्नमवार सभागृह येथे शाल व सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी ऐश्वर्या भालेराव, उदघाटक भारती कांबळे, प्रमुख अतिथी जयश्री चन्नुरवार, अंजली सुर, संगीता रोहनकर यांची उपस्थिती होती .

यावेळी तालुक्यातील प्रशासकिय सेवा, राजकिय, सामाजिक, कला, क्रिडा, संगीत, साहित्य, सांस्कृतीक, शिक्षण, पर्यावरण, प्रेरणादायी, गृहिणी, मजुरी आदी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिला तसेच सुवतींचा शाल व सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.

संचालन सुजाता बरडे तर आभार सुशांत वाकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता सचिन वाकडे, नितीन रायपुरे, रुपेश कोठारे, फुलचंद मेश्राम, वासु, प्रशिक दुर्गे, अनिकेत बुग्गावार, श्रीकांत देवगडे, महेश भुरसे, मिथून वासेकर, प्रविण चलाख, सुरज कामडे यांनी सहकार्य केले .