पोलीस स्टेशन मूलच्या वतीने सायबर सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

35

मूल : पोलीस स्टेशन मूलच्या वतीने शासनस्तरावरील सूचनेनुसार सायबर सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. २ फेब्रुवारी रोजी मूल शहरातील ज्येष्ठ नागरिकांची सभा बोलाविण्यात आली.

सध्या इंटरनेटवरून मोठ्या प्रमाणात महिला पुरूष आणि युवावर्गाचीही फसवणूक केल्या जात असून, आर्थिक फसवणूक, युवक-युवतींच्या फसवणुकीचे कित्येक प्रकरणे पुढे आली आहेत. यात जागरूकता कशी करता येईल. याकरिता पोलीस प्रशासनाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ३ मार्च २०२२ रोजी सर्व बँकेतील शाखा व्यवस्थापकांची सभा बोलावन क्राईमबाबत माहिती देऊन सतर्क असण्याबाबतचे निर्देश देण्यात आले.

शनिवारी ५ मार्च २०२२ रोजी विद्यालय मूल येथे पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत व उपनिरीक्षक प्रशात ठवरे यांनी स्मार्ट फोनद्वारे होणारे विपरित परिणाम व गुन्हे याबाबत विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रकाराबाबत शहरांत सायबर नवभारत कन्या जनजागृती व्हावी म्हणून पोलीस प्रशासनाच्यावतीने नवभारत कन्या विद्यालय मूल येथून मुख्य मार्गाने गांधी चौक, बस स्टॅण्ड ते विद्यालय अशी प्रभातफेरी आली.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंगला सुंकरवार, पर्यवेक्षक एस. एस. पराम, सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी प्रभातफेरीत पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, उपनिरीक्षक प्रशांत ठवरे, डोंगरे महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी, विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.