मूल:- निराधार,वृदध,अंध,अपंग,शारीरीक मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती,विधवा,अत्याचारित महिला,घटस्फोटित महिलांना जगणे काही प्रमाणात सुसहय व्हावे यासाठी शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजना सुरू केली आहे.
या योजनेचा अनेक गरजुंना लाभ मिळत आहे. या योजनेसंदर्भात नुकतीच मुल तहसील कार्यालयात योजना समिती सदस्यांची सभा पार पडली. यामध्ये 171 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. आता या लाभाथ्र्यांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे.
यांची उपस्थिती:- संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष, राकेश रत्नावार, नायब तहसिलदार ठाकरे, तसेच, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य दशरथ वाकुडकर, संजय गेडाम,अर्चना चावरे, सोनल मडावी, सत्यनारायण अमदुर्तीवार व कर्मचारी गिरडकर उपस्थित होते.
पात्रतेचे निकष:- निराधार,वृदधव्यक्ती,अंध,अपंग,शारीरिक मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती,विधवा,अत्याचारित महिला,घटस्फोटित महिला,अनाथ मुले,तृतीयपंथी,परित्यक्त्या,श्रावणबाळ योजना
किमान 18 वर्षा पासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवष्यक
आवश्यक कागदपत्रे:- वार्षीक उत्पन्न 21000 हजारांच्या आत असणे आवश्यक आहे .वयाचा दाखला,रहिवासी दाखला,उत्पन्नाचा दाखला,अपंग असल्याचे प्रमाणपत्रवयाचा दाखला,रहिवासी दाखला,उत्पन्नाचा दाखला,दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबाबत साक्षंकित उतारा,अपंगत्व,रोगग्रस्तबाबत जिल्हा शल्यचिकित्सक/सरकारी रूग्णालयांच्या वैद्यकिय अधीक्षकांचा दाखला ,इतर कागदपत्रे
कसा कराल अर्ज?
या योजनेच्या लाभासाठी अगोदर कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागत होता.परंतु आता आॅनलाईन अर्ज करावा लागतो. याची सुविधा आपले सरकार सेवा अंतर्गत प्रत्येक वार्डमध्ये,गावामध्ये ई-सेवा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.तिथे जाऊन आपण अर्ज करू शकता.
असे आहे लाभार्थी:- मंजूर प्रकरण
दिनांक 28/02/2022 रोजी तहसिल कार्यालया,मूल येथे राकेश रत्नावार,अध्यक्ष,संजय गांधी निराधार योजना समिती यांचे अध्यक्षतेखाली लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्याकरिता सभा आयोजित करण्यांत येऊन श्रावणबाळ योजना -108,वृध्दपकाळ योजना-43, संजयगांधी निराधार योजना-20 असे एकूण 171 प्रकरणे मंजूर करण्यांत आली.