ज्वेलरी व्यावसायिकाची आत्महत्या

31

मौजा चांदली बुजरूक येथील ऐका सधन कुटुंबातील ३२ वर्षाचा युवक चेतन दिलीप चिमड्यालवार याचा मृतदेह केळझर परिसरातील रेल्वे लाईनच्या पुलाच्या खाली पाण्यात तरंगताना आढळून आल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने मुल तालुक्यात चर्चा केली जात आहे.

केळझर परिसरात पाण्यात मृतदेह असल्याची माहिती रेल्वे प्रशासना कडून मुल पोलिसांना देण्यात आल्याचे समजले असता मुल पोलीस केळझर येथे जाऊन पुलाखाली पाण्यात उबड्या अवस्थेत तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढले तेव्हा सदर युवकाची ओळख पटली असून सावली तालुक्यातील मौजा चांदली बूज.

येथील चेतन दिलीप चिमड्यालवार वय ३२ वर्ष असून त्याचे सिंदेवाही येथे ज्वेलरीचे दुकान असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.

 सदर युवकाचा मृतदेह मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. सदर युवकाने आत्महत्या केल्याचे समजले.

पुढील तपास मुल पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून चांदलीचा युवक, सिंदेवाहिला दुकान व मृतदेह केळझर परिसरातील पुलाच्या खाली पाण्यात कसा काय हे मात्र तपासणीत बाहेर येणार असल्याचेही बोलले जात आहे.