बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती

28

जर तुम्ही बँकेत नोकरीसाठी इच्छुक असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने (Bank of Maharashtra, BOB) ने जनरलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज मागवले आहेत. याअंतर्गत एकूण ५०० पदांची भरती केली जाणार आहे.

स्केल २ आणि स्केल ३ साठी ही भरती केली जात आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच ५ फेब्रुवारी पासून सुरू होत असून ती २२ फेब्रुवारी पर्यंत चालेल. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे, ते त्यासाठी अर्ज करू शकतात.महाराष्ट्र बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जनरलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज करणारे सर्व उमेदवार ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असावेत. तसेच, SC/ST/OBC/PWBD उमेदवारांसाठी ५५% गुण असावेत.

तसेच, जनरलिस्ट ऑफिसर सेकंड स्केलच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. तर सामान्य अधिकारी तृतीय श्रेणीच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ते ३८ वर्षे असावे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाईल.

सामान्य अधिकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी, महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट द्यावी. त्यानंतर ‘करिअर’ विभागात जाऊन’ऑनलाइन अर्ज करता येईल.

अशा प्रकारे निवड होईल

बँक ऑफ महाराष्ट्रने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे जनरलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. याशिवाय, भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

जाहिरात क्र.: AX1/ ST/RP/Generalist Officer Scale-II & III/Project III/2022-23

Total: 500 जागा 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 जनरलिस्ट ऑफिसर  MMGS (स्केल II) 400
2 जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल III) 100
Total 500

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA   (ii) 03 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA   (ii) 05 वर्षे अनुभव.

वयाची अट: 31 डिसेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 25 ते 35 वर्षे
  2. पद क्र.2: 25 ते 38 वर्षे

Fee: General/OBC: ₹1180/-     [SC/ST: ₹118/-, PWD/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2022

परीक्षा (Online): 12 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा