धान खरेदीस ३१ मार्च पर्यंत मुदत वाढ देण्यात यावी-सभापती घनश्याम येनूरकर

34

मुल- खरीप २०२१-२०२२ या वर्षकरिता शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्याची मुदत ३१ जानेवारी २०२२ पर्यंत शासनाने दिलेली आहे. परंतु धानाची विक्री करण्याकरिता असंख्य शेतकऱ्यांनी आणलाईन नोंदणी केलेली असून नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल धान विहित मुदतीत खरेदी करणे शक्य होत नाही याचे खरे कारण ऐनवेळी अवकाळी पावसाने सतत आठ दिवस थयमान घातल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

एवढेच नव्हेतर धान चूर्णा करण्यास शेतजमीन ओली असल्याने थ्रेशर मशीन शेतात जाऊ शकत नव्हती ही महत्त्वाची अडचण शेतकऱ्यांसमोर होती त्यामुळेच हंगामाला उशीर झालेला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचे धान शासकीय खरेदी केंद्रावर आणता आले नाही. करिता शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर निर्धारित मुदतीत धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यास अडचण निर्माण झालेली असून

माहे जानेवारी २०२२ पर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे धान खरेदी होऊच शकत नाही करिता शेतकऱ्यांची ही महत्त्वाची अडचण लक्षात घेऊन खरीप हंगाम २०२१-२०२२ करिता पूर्वी देण्यात आलेली मुदत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने पुढे दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवून देण्यात यावी अशा मागणीचे विनंती पत्र राज्य शासनाचे अन्न नागरी पुरवठा मंत्री नाम.छगन भुजबळ यांचेकडे मुल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनूरकर यांनी पाठविले आहे.

मुदत वाढ मिळण्या बाबतचे प्रतिलिपी पत्र मदत पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार, जिल्ह्याचे खासदार मान. बाळूभाऊ धानोरकर, मान जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रपूर यांनाही पाठवून विनंती केली आहे