मूल शहरात स्वच्छता अभियान मोहीम भरधाव राहील अशी अपेक्षा
पर्यावरण प्रेमी व नवभारत विद्यालय मूलच्या शिक्षीका सौ. वर्षा भांडारकर यांची “मूल नगरपरिषद स्वच्छता अभियान..२०२२” करीता ब्रॅॅड अम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषद सर्वसाधारण सभेत तसा ठराव पारित करून सवॉनुमते वर्षा भांडारकर यांना हा सन्मान बहाल करण्यात आला.तसे नियुक्तीपत्र न.प. मुख्याधिकारी मेश्राम यांनी प़दान केले आहे.
संपुर्ण जिल्हयात पयॉवरण व वुक्षप़ेमी म्हणून सौ. वर्षा भांडारवार यांची ख्याती आहे.वुक्षवल्ली संगोपणासाठी आपला संपुर्ण वेळ घालविताना विद्यार्थ्याना पयॉवरणाचे अनन्यसाधारण महत्त्व प़त्यक्ष आचरणातून समजावणे,परिसरातील जनतेमध्ये जनजागृती करण्याकरीता सौ.भांडारकर सतत प़यत्नरत असतात.
नगरपरिषद मूल अंतगंत स्च्छता अभियान मोहीम मोठया स्तरावर राबविण्यात येते.सौ. भांडारकर यांची ब्रन्ड अम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आल्याने मूल शहरात स्वच्छता अभियान मोहीम भरधाव राहील अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत असून सौ.भांडारकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.