इन्कम टॅक्ससंबंधित कामांसाठीही आधार कार्डची गरज असते. त्यामुळे आधार कार्ड बँक खातं, मोबाइल नंबर आणि पॅन कार्डशी लिंक असणं गरजेचं ठरतं. आधार कार्ड नसल्यास कोणतंही काम करणं कठीण होऊ शकतं. एका व्यक्तीचं एक आधार कार्ड असतं.
आधार कार्ड एक असलं, तरी एका व्यक्तीचे अनेक मोबाइल नंबर आणि अनेक बँक अकाउंटही असतात. त्यामुळे अनेकदा संभ्रम निर्माण होतो की आधार कार्ड कोणत्या बँक अकाउंटशी आणि मोबाइल नंबरशी लिंक आहे. घरबसल्या ऑनलाइनरित्या कोणत्या बँकेशी, मोबाइल नंबरशी आधार लिंक आहे, हे तपासता येतं.
– सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर जा. – इथे Check Your Aadhaar and Bank Account वर क्लिक करा.
– इथे आधार नंबर आणि सिक्योरिटी कोड टाकावा लागेल. – आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक OTP येईल. – OTP UIDAI वेबसाइटवर टाका. – इथे लॉगइन ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करा.
– लॉगइन केल्यानंतर आधारशी जोडलेली सर्व बँक अकाउंट्स डिटेल्स समोर येतील. कसं Lock कराल Aadhaar Card – आधार कार्ड लॉक करण्यासाठी सर्वात आधी आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवरुन 1947 वर GETOTP मेसेज लिहून पाठवावा लागेल. मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल. तुम्हाला पुन्हा 1947 या नंबरवर ‘LOCKUID आधार नंबर’ आणि हा OTP लिहून पाठवायचा आहे. अशाप्रकारे तुमचं आधार कार्ड लॉक होईल.
आपला आधार नंबर आपल्या बँक खात्याशी जोडला गेलेला नाही आहे. कृपया लक्षात घ्या की अर्ज सादर करण्यासाठी आधार नंबर बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. कृपया अर्ज सबमिट करण्यासाठी आपला आधार नंबर आपल्या बँक खात्यासह जोडा.कृपया आपला आधार नंबर बँक खात्याशी जोडण्यासाठी आपल्या जवळच्या बँकेस भेट द्या. आपण खालील चरणांचे अनुसरण करून आधार आणि बँक खाते लिंक स्थिती तपासू शकता.1. आधार वेबसाईटला भेट द्या- https://www.uidai.gov.in/ २.
येथे जा- https://resident.uidai.gov.in/bank-mapper
आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि स्थिती तपासा.