नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी भरती

61

कोरोना आणि लॉकडाऊन दरम्यान काही जाणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. याशिवाय अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत. अशा सर्वांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे.

             नवोदय विद्यालयात नोकरीची मोठी संधी आहे. जवळपास 1 हजार 925 रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही मोठी बातमी आहे. नवोदय विद्यालय समितीने बंपर भरती काढली आहे. एकूण 1925 रिक्त जागांवर तीन गटांमध्ये भरती करण्यात येणार आहे. अ , ब आणि क गटातील पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत.इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची मुदत 12 जानेवारीपासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी असणार आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

Total: 1925 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A) 05
2 असिस्टंट कमिशनर (अ‍ॅडमिन) (ग्रुप-A) 02
3 स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B) 82
4 असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप-C) 10
5 ऑडिट असिस्टंट (ग्रुप-C) 11
6 ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (ग्रुप-B) 04
7 ज्युनियर इंजिनियर (ग्रुप-C) 01
8 स्टेनोग्राफर (ग्रुप-C) 22
9 कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप-C) 04
10 कॅटरिंग असिस्टंट (ग्रुप-C) 87
11 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (ग्रुप-C) 630
12 इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप-C) 273
13 लॅब अटेंडंट (ग्रुप-C) 142
14 मेस हेल्पर (ग्रुप-C) 629
15 मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप-C) 23
Total 1925

 

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) मानविकी/विज्ञान/वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) पदवीधर    (ii) 08 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)  (ii) 02 वर्षे अनुभव. 
  4. पद क्र.4: (i) पदवीधर    (ii) कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान.
  5. पद क्र.5: B.Com
  6. पद क्र.6: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी   (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा     (ii) 03 वर्षे अनुभव 
  8. पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) शार्ट हैंड 80 श.प्र.मि.व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (12000 KDPH.) किंवा शार्ट हैंड 60 श.प्र.मि.व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. (9000 KDPH.)
  9. पद क्र.9: (i) पदवीधर    (ii) एक वर्षाच्या कॉम्प्युटर डिप्लोमासह वर्ड-प्रोसेसिंग आणि डेटा एंट्रीमधील कौशल्य.
  10. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण +दोन वर्षाचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण + कॅटरिंग डिप्लोमा +03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य 
  11. पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण 
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/प्लंबर)  (iii) 02 वर्षे अनुभव 
  13. पद क्र.13: 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र   किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
  14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 10 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 10 फेब्रुवारी 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 & 2: 45 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.3, 6, 7, & 10 : 35 वर्षांपर्यंत 
  3. पद क्र.4, 5, 9, 13, 14 & 15: 18 ते 30 वर्षे
  4. पद क्र.8 & 11: 18 ते 27 वर्षे
  5. पद क्र.12: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: [SC/ST/PH: फी नाही]

  1. पद क्र.1 & 2: General/OBC: ₹1500/- 
  2. पद क्र.3: General/OBC: ₹1200/- 
  3. पद क्र.4 ते 12: General/OBC: ₹1000/- 
  4. पद क्र.13, 14 & 15: General/OBC: ₹750/- 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2022  (11:59 PM)

परीक्षा (CBT): 09 ते 11 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

नॉन-टीचिंग पदांच्या भरतीसाठी आणि निवड प्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यातील 9 ते 11 मार्च 2022 लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना पुढच्या राऊंडसाठी सिलेक्ट करण्यात येईल. अंतिम टप्प्यात मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीनंतर निवड करण्यात येईल.

सहाय्यक आयुक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 1500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. महिला नर्सिंग स्टाफसाठी 1200 रुपये, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर आणि एमटीएससाठी 750 रुपये आणि इतर पदांसाठी उमेदवाराला 1000 रुपये अर्ज शुल्क भरावं लागणार आहे. याशिवाय अधिक माहिती तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर मिळू शकणार आहे.