अपघातात एक महीला ठार तर अकरा जण जखमी झाल्याची घटना आकापूर

28

मुल तालुक्यातील आकापूर गावाजवळील  भरधाव वेगात धावणा-या बोलेरो चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटल्याने वळणमार्गावर झालेल्या अपघातात एक महीला ठार तर अकरा जण जखमी झाल्याची घटना आकापूर लगत घडली.

ओरिसा वरून करीमनगर (तेलंगाना) येथे रोजगारासाठी बोलेरो (OD 03 M3197) जीपने गडचिरोली मूल मार्गाने भरधाव वेगात जात असताना तालुक्यातील मूल पासुन ४ कि.मी.अंतरावर असलेल्या आकापूर गावालगतच्या एल आकाराच्या वळण मार्गावर मंगळवारी पहाटे ४ वा. चे सुमारास बोलेरो जीप चालक जयप्रकाश सुरेशचंद्र गहीर (तरबोड) याचे वाहणावरील नियंञण सुटले. त्यामूळे अपघातप्रवण असलेल्या वळण मार्गाच्या डाव्या बाजुला सदर बोलेरो उलटली.

    यामध्ये पुतना गजपती धरोआ (दलपीपाडा) ही महीला जागीच मृत्यु पावली, झालेल्या अपघातात वाहण चालक जयप्रकाश गहीर याचेसह सत्यशीला धरोवा,गजपती धरोवा, गोमती माझी, प्रताप माझी, देवराज माझी, वसंत सहानी, लिलावती माझी, हलधर धरोवा, जितु धरोवा, हरीराम माझी, जितुराम माझी हे अकरा जण जखमी झाले.

अपघाताची माहीती मिळताच मूल पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवुन ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना उपचाराकरीता येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. चंद्रपूर-गडचिरोली या राज्यमार्गाचे अलीकडेच महामार्गात रूपांतर झाल्याने सदर महामार्गाचे सिमेंटीकरणासह रूंदीकरणाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. मार्गाच्या बाजुला विद्युत दिवे, फलक, रिप्लेक्टर आदी लावण्याचे काम सुरू आहेत. त्यामूळे घटनेच्या वेळेपर्यंत सदर अपघातप्रवण मार्गावर रिप्लेक्टर आणि फलक लावण्यात आलेले नाहीत.

परंतु सदर मार्गाचे रूंदीकरणासह सिमेंटीकरण झाल्याने वाहण चालक सदर उतार मार्गावर नेहमी भरधाव वेगात वाहन चालवित असतात. शिवाय अपघाताचे वेळेस मार्गावरील वाहतुक कमी आणि पावसाची रिपरिप असल्याने मार्ग ओला झालेला होता. पहाटेच्या वेळेस मार्ग मोकळा असल्याने बोलेरो चालक वेगात वाहण चालवित होता. त्यामूळे जखमींपैकी काहीजण वाहण चालकास वाहण हळु व सावकाश चालविण्यास सांगत होते.

परंतु वाहण चालकाने प्रवाश्यांचे ऐकले नसल्याने शेवटी वळण मार्गावर वाहण चालकाचे नियंत्रण सुटुन अपघात घडल्याचे जखमींनी सांगीतले. जखमीपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्यांना जिल्हा सार्वजनिक रूग्णालयात हलविण्यात आले.

घटनेचा तपास ठाणेदार यांचे मार्गदर्शनात पोउनि गायकवाड आणि पोकाँ राकेश फुकट करीत आहेत.