PM KISAN : पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळाला नसेल तर असा अर्ज..!

46

शेतकरी स्वत: अर्ज करु शकणार आहे. योजनेसाठी पात्र आहेत पण 10 हप्ताच मिळाला नाही त्यांना एक अर्ज करुन 31 मार्च पर्यंत रखडलेला हप्ता मिळवता येणार आहे.शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यामधील पात्र नसतानाही लाभ घेणारे वगळण्यात आले आहेत पण पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे.

असा करा अर्ज…

पंतप्रधान-किसान पोर्टलला (https://pmkisan.gov.in/) भेट देऊन तुम्ही स्वत:ला अर्ज करू शकता. यासाठी येथे एका अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज नाही. याचा अणखीन एक असा फायदा आहे की, तुम्ही स्वत: नोंदणी केली की तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड (KCC) देखील सहज मिळू शकते. ज्यामध्ये 3 लाख रुपयांचे कर्ज केवळ 4 टक्के व्याजदराने मिळणार आहे.

पंतप्रधान किसान योजनेच्या वेबसाइटवरही हा फॉर्म उपलब्ध आहे. प्रथम आपल्याला या योजनेशी संबंधित (https://pmkisan.gov.in/) अधिकृत साइटला भेट देणे आवश्यक आहे. मग उजवीकडे तुम्हाला FARMER CORNERS पर्याय दिसेल. त्यावर नवीन FARMER CORNERS क्लिक करा. त्यानंतर नविन पान ओपन होईल ज्यामध्ये शहरी आणि ग्रामीण शेतकऱ्यांचा पर्याय असेल. यामध्ये तुम्हाला अवगत असलेली भाषा निवडून फॉर्म भरायचा आहे.

या महत्वाच्या नोंदी कराव्याच लागणार आहेत

वैयक्तिक माहिती भरताना आधार क्रमांक, मोबाइल नंबर, राज्य नाव टाकावे लागणार आहे. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी आणि त्यानंतर captcha कोड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्यासमोर पुन्हा नवीन पेज ओपन होईल यामध्ये राज्ये, जिल्हे, तहसील, ब्लॉक आणि गावे भरावी लागतील. लिंग व श्रेणी, बँकेचे नाव, खाते क्रमांक, पत्ता, आई, वडील किंवा पती यांचे नाव, जमीन नोंदणी ओळखपत्र, रेशन कार्ड क्रमांक, जन्मतारीख आणि जमीन रेकॉर्ड भरून ते बरोबर आहे का ते पहावे लागणार आहे. याशिवाय सांगतील ते काही पेपर अपलोड करणे देखील आवश्यक आहे.