अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची नवीन जिल्हा कार्यकारिणी गठित.

85

भद्रावती :- अखिल भारतीय ग्राहक पंचायत भारतातील सगळ्यात मोठी आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली अशासकीय संघटना आहे.आपल्या कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या फसवणुकीपासून सावधान करीत त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत विविध विषयांवर अभ्यास करून नवीन पारदर्शी कायदा करायला शासनाला प्रवृत्त करणारी ही संघटना आहे.   

चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या संघटन वाढिस भरीव अशी कामगिरी आजतागायत केलेली असून आज बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या फसवणुकीच्या प्रकारात वेगवेगळे बदल झाले असून सुशिक्षित व्यक्ती सुद्धा आपले कर्तव्य व इतर हक्क विसरत चालला आहे.कुठल्याही वस्तू वा सेवा प्रकारची खरेदी, आनलाईन खरेदी करताना त्याची होणारी फसवणूक ही वाढू लागली आहे अशा स्थितीत त्याला योग्य मार्गदर्शन व उपयुक्त सल्ला व माहिती मिळणं आवश्यक आहे.

ग्राहक पंचायत च्या माध्यमातून *सर्वसामान्य माणसातील काही जण एकत्र येऊन सर्वसामान्य माणसाला पडणाऱ्या सर्वसामान्य प्रश्नांची उकल करण्यासाठी मदत करतात * हीच ती ग्राहक पंचायत ही संघटना होय. बिंदुमाधव जोशी व राजाभाऊ पोफळी यांच्यासह अनेक मराठी माणसांचे या संघटनेच्या वाढिस सहकार्य व मार्गदर्शन लाभलेले आहे.

अशा या स्वयंसेवी संस्थेच्या जिल्हा स्तरावर कार्य करण्यासाठी काही पदाधिकारी यांनी भद्रावती येथे एकत्र येऊन पुढिल तीन वर्षांसाठी एका नवीन कार्यकारिणी चे गठण केले.

संघटनेचे सचिव विनोद माढई यांचे अध्यक्षतेखाली व पुरुषोत्तम मत्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली .त्यात जिल्ह्यातील विविध तालुक्यातून बरेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.या सभेत सर्वंकष विचार करून नवीन सक्षम पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत

 जिल्हा चंद्रपूर कार्यकारिणी
१)अध्यक्ष-पुरुषोत्तम मत्ते भद्रावती
२)उपाध्यक्ष- १)विनोद माढई चंद्रपूर
उपाध्यक्ष २)सुदर्शन तनगुलवार भद्रावती
३)संघटक– दीपक देशपांडे मूल
४)सहसंघटक-वसंत वऱ्हाटे भद्रावती.
५)सचिव- ज्ञानेश्वर पिंपळे, वरोरा
६)सहसचिव-आप्पाजी ढवस
तूकुम चंद्रपूर
७)कोषाध्यक्ष-अशोक शेंडे भद्रावती.
८)महिला आघाडी प्रमुख
१)नंदिनी चुनारकर चंद्रपूर
२)भाग्यश्री भुमकर उर्जानगर
३)संगीता लोखंडे चंद्रपूर
४)किरण साळवी भद्रावती.
९)प्रमुख मार्गदर्शक:-
१)हरिभाऊ गरफडे नागभीड
२)मधूसूदन भुमकर उर्जानगर
१०)प्रसिद्धी प्रमुख:-प्रवीण चिमुरकर भद्रावती
११)कार्यकारिणी सदस्य:-
१)प्रा. राम चिचपाले चिमूर
२)प्रद्युम्न माढई चंद्रपूर
३) प्रदीप भट्टलवार चंद्रपूर ४) डॉ जयश्री मत्ते भद्रावती