वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

45
मूल :—आपले काम आटोपून फुलझरी वरून डोणी येथे जात असताना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने युवकावर हल्ला करून ठार केल्याची घटना कक्ष क्रं. 351 मध्ये घडली. भारत रामदास कोवे रा.डोणी वय 23 असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या युवकाचे नांव आहे. मूल तालुक्यातील व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील डोणी येथील भारत रामदास कोवे वय 23 वर्षे हे कामानिमीत्त बाहेरगावी गेला होता. काम पुर्ण करून फुलझरी मार्गे डोणी येथे सायं. 7 वाजता दरम्यान जात असतांना दबा धरुन बसलेल्या वाघाने त्याच्यावर झडप घेत जागीच ठार केले. सदर घटना मूल बफर क्षेत्रातील करवण येथील कक्ष क्रं. 351 मध्ये
घडली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मूल येथे आणण्यात आले.वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर,क्षेत्र सहाय्यक धुर्वे व इत्तर कर्मचारी हे घटना स्थळी जावून तपास केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान मृताच्या कुटुंबीयांस वनविभागाने 25 हजार रुपयांची मदत केली.