Aadhar Card Update आधारकार्डमधील एका चुकीमुळे बँक खाते होऊ शकते साफ, लगेच करा अपडेट

24

आधारकार्ड आपल्या आयुष्याचं अविभाज्य घटक बनलं आहे. आधार कार्डशिवाय अनेक काम होत नाहीत. सरकारने काही ठिकाणी आधारकार्ड सक्तीचं केलं आहे.

अद्याप तुम्ही आधारकार्ड तयार केलं नसेल तर लवकराच लवकर आधार कार्ड तयार करु घ्या अन् वेळोवेळी अपडेटही करा. आधार कार्ड तयार करताना मोबाईल क्रमांक, पत्ता, ई-मेल यासारख्या सर्व बाबींची माहिती द्यावी लागते. आधार कार्डवरील नाव बदलायचं (Aadhar Card Update) असेल तर आधार सेवा केंद्रांत जाऊ शकता. त्याच प्रमाणे आधारकार्डवेळी दिलेला रजिस्टर मोबाईल क्रमांक नसेल अथवा हरवा असेल तर तुमचं आधार अपडेट होत नाही. जर मोबाईल क्रमांक हरवला असेल तर तात्काळ अपडेट करावं. आधारकार्डवेळी दिलेला नंबर हरवला असेल तर तात्काळ अपडेट करुन घ्या, जेणेकरुन फसवूण होणार नाही. जर तुमचा मोबाईल क्रमांक हरवला असेल आणि नवीन मोबाईल क्रमांक आधार कार्डमध्ये अपडेट नसेल, तर तुमची लाखो रुपयांची फसवणूक होऊ शकते, अन् याबाबत तुम्हाला समजणारही नाही. कारण आधारकार्डसोबत लिंक असणारा मोबाईल क्रमांक तुमच्याकडे नसतो. बँक खाते उघडताना आपण मोबाईल क्रमांकासोबत आधारकार्डही दिलेलं असते. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर हरवला असेल तर तात्काळ अपडेट करा.

यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे UIDAI ने आधारकार्ड धारकांना म्हटलेय की, तुमचा मोबाईल क्रमांक नेहमी आधारकार्डमध्ये अपडेट करा. फसवणूक करणाऱ्यांपासून वाचण्यासाठी हा सल्ला देण्यात आलाय. मोबाईल क्रमांक आधार कार्डमध्ये कसा कराल अपडेट….

1. uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.. अथवा https://resident.uidai.gov.in/verify-email-mobile या लिंकवर क्लिक करा…
2. त्यानंतर My Aadhaar वर क्लिक करा
3. Aadhaar Services टॅबवर क्लिक करुन Verify Email/Mobile Number वर क्लिक करा.
4. तुमचा 12 क्रमांकाचा आधारकार्ड नंबर टाका.. तसेच इतर माहिती भरा
5. कॅप्चा कोड भरा…. त्यानंतर send OTP वर क्लिक करा
6. तुमच्या मोबाईल क्रमांकावर अथवा रजिस्टर मेलवर एक ओटीपी येईल…. असं केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक अथवा ई-मेल आधारमध्ये लिंक आहे का हे समजेल.
7. जर ओटीपी आला नाही, तर जमजून घ्या की आपला मोबाईल क्रमांक आधारमध्ये अपडेट नाही. आधार केंद्रामध्ये जाऊन मोबाईल नंबर अपडेट करु शकता…
8. मोबाईल क्रमांक अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवीन आधारकार्ड घ्यायची गरज नाही. मोबाईल नंबर रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल…